Posts

Showing posts from August, 2020

'वर्क फ्रॉम होम ' बायको

Image
'वर्क फ्रॉम होम ' बायको  - गौरी गाडेकर  हाय ! पत्र बघून चकित झालास ना ? म्हणजे डायरेक्ट बोलायचं सोडून, मेसेज-मेल न करता चक्क पत्र!अर्थात, पूर्वी  अर्ध्या -एका मार्कासाठी मायना, तारीख वगैरे लिहून बोअर व्हायचे. त्यामुळे ते सगळं ड्रॉप केलंय.  सॉरी ! हो.माफी मागायलाच पत्र लिहिलं. कारण एवढं सगळं सलग बोला-ऐकायला हल्ली वेळच  कुठे असतो आपल्याला?  मघाशी मी किचनमध्ये असताना बॉसचा कॉल आला. क्लिअर ऐकू येईना, म्हणून हॉलमध्ये गेले. कॉल संपवून परत आले तर ओटाभर दुधाचा महापूर. वाटेत भेटेल त्याला  चपेटमध्ये घेत.  मग काय?  माझ्या तळपायाची तिडीक मस्तकात गेली. बॉस, त्याचं ते डिस्कशन, त्याची माझ्याकडून असलेली एक्सपेक्टेशन्स, ..... दूध, गॅस, ओटा, दुधाच्या ओहोळात सापडलेली स्वच्छ घासून उपडी वाळत ठेवलेली भांडी....... सगळा राग शेवटी तुझ्यावर निघाला. नेहमीप्रमाणेच. गेले चार -पाच महिने 24×7 फक्त  एकमेकांचीच  तोंडं बघून विटलोय आपण.  पण यावेळी मात्र तू तुझ्या कामातून ब्रेक घेऊन उठलास. मला एका शब्दानेही उत्तर न देता गुपचूप जाऊन तो ओटा, गॅस, भांडी सगळं स्वच्छ ...