Posts

Showing posts from January, 2020

द्रौपदी

Image
       द्रौपदी आटपाट नगर होतं त्यात मोठमोठे वाडे होते तालेवारांचे  त्यात पाळण्यात रडत होते मुलगे दुडुदुडु धावत होते मुलगे शाळेत न जाण्याचा हट्ट करत होते मुलगे  मस्ती,गुंडागर्दी करत होते मुलगे  हो. त्या आटपाट नगरात   तालेवारांच्या त्या मोठमोठ्या वाड्यांत  जन्माला येत होते फक्त मुलगे  मुलगे,....मुलगे वंशाचे दिवे आणि हे वंशाचे दिवे पेटवण्यासाठी  आणि हे वंशाचे दिवे तेवत ठेवण्यासाठी आवश्यक असणा-या स्त्रिया आयात केल्या जायच्या आसपासच्या नगरांतून स्त्रिया, हुंडा, वरदक्षिणा, मानपान आणि असं बरंच काही जन्मभर चालणारं तर एक दिवस अक्रीतच घडलं आटपाट नगरातल्या  एका तालेवाराच्या  भल्यामोठ्या वाड्यात  एक मुलगी जन्मली  दोनशे वर्षांनंतर म्हणे त्या खानदानात  मुलगी जन्माला आली देवाची कृपा म्हणायची की धाडस मातापित्याचं? बहुधा पित्याचं धाडस मुलगी होऊनही तिला जिवे न मारण्याचं धाडस टोपभर उकळत्या दुधात टाकून तिला पोटभर दूध न पाजण्याचं धाडस खोल खड्डा खणून  दाईकरवी जिवंत न गाडण्याचं धाडस इतर मार्ग चोखाळून  तिचं आयुष्य न ...